आज ६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात येऊन सामूहिक संविधान वाचन करण्यात आले.
