डांग सेवा मंडळ नाशिक संचालित जनता कन्या व जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.व कल्याणी गायकवाड,कल्याणी गावीत,धनश्री गांगुर्डे,प्रेम चौधरी.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही वसतिगृहांच्या कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
