News Cover Image

जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्सवात साजरी

   जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..

            आज दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. नंदन सर, विद्यालयाचे शिक्षक श्री. आहिरे सर, श्री.पगार सर,अधिक्षक श्री. पाटील सर व वसतिगृहाचे स्वयंपाकी, मदतनीस आणि विद्यार्थी मित्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले व वसतिगृहाचे विद्यार्थी कु. श्रीराम साबळे, कु. कल्पेश चौरे, खुशाल साबळे यांनी भाषण केले तसेच अधिक्षक श्री. पाटील सर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर माहिती दिली अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक मा. श्री. नंदन सर यांनी भाषण केले व अधिक्षक श्री. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.