About

*वसतिगृहाची थोडक्यात माहिती*

इ. स.१९३७ रोजी सुरू झालेल्या शाळा फक्त चौथी पर्यंत होत्या पुढच्या शिक्षणाची सोय ही करायलाच हवी असं डांग सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब बिडकर यांना वाटत होतं,त्यासाठीच वसतिगृहाची ही संकल्प सोडला गेला. वसतिगृहात मुलं राहिली तर, त्याच्या जेवणाखण्याचा खर्च आई वडिलांवर पडणार नव्हता.मुलांच्या  व्यक्ती विकासाच्या दृष्टीनेही, ती सतत कार्यकर्त्याचा सहवासान असणं योग्यच होतं. दि.४/४/१९४१ मध्ये मुल्हेर येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू झालं तेथे आरंभी हरिजन-गिरीजन मिळून १५विद्यार्थी राहू लागेल. श्री. रा. चि. कुलकर्णी यांनी वसतिगृहाची जबाबदारी घेतली. चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने त्यांच मुलांकडे लक्ष असे. आज याच छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पहात आहोत. वसतिगृहातील विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनाकडे शिक्षणाची व आरोग्याची अधिक्षक स्वतः काळजी घेतात रोज सकाळी ५:३० मिनिटांनी प्रार्थना होते व्यायाम घेतले जातात, वसतिगृहाची साफसफाई केली जाते, नंतर स्नानसंध्या आटोपून आठ वाजता नाश्ता दिला जातो साडे आठ ते अकरा वाजेपर्यंत अभ्यासिका वर्ग घेतला जातो सव्वा अकरा वाजता जेवण दिले जाते व विद्यार्थ्यांची शाळेची तयारी करून बारा वाजता विद्यार्थी शाळेत जातात दुपारी १२ते ५:१५ शाळेत असतात.