News Cover Image

सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन्य जीवांची माहिती

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतिने विद्यार्थ्यांना वन्य जीवांची माहिती अंतर्गत चित्ता या प्राण्याचे महत्त्व व गरज या विषयी माहिती दिली. तसेच जैवविविधतेविषयी माहिती देण्यात आली. या साठी प्रमुख मार्गदर्शक श्री डी डी घुले वनाधिकारी, पेठ व त्यांचे सहकारी श्रीमती जाधव मॅडम हे होते. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर  उपमुख्याध्यापक श्री सागर ए रम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर हजर होते.  तसेच श्री पगार सी. बी., श्री जाधव ए वाय, श्री सोनवणे डी एन. श्रीमती हुंडीवाले ए. बी. यांनी कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले.